Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे पावित्र्य राखा - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे आवाहन




फलटण चौफेर दि १४ जून २०२५: छत्रपती संभाजी महाराजांचे आजोळ असलेल्या फलटण येथे छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याची उभारणी ही येथील तरुणाईपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचीच दीर्घकालीन इच्छा होती. 




छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या जीवनात धर्म, स्वराज्य आणि समाजहितासाठी प्राणाची आहुती दिली. त्यांच्या त्यागमय आणि शौर्यपूर्ण कार्याचे स्मरण प्रत्येकाच्या मनात आहे.मात्र, दुर्दैवाने मागील काही दिवसांपासून या पवित्र स्मारक परिसरात काही मद्यपी आणि उपद्रवी व्यक्तींनी गैरकृत्य करत स्मारकाच्या पावित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट अत्यंत निंदनीय असून सर्व समाजाने याचा निषेध करावा, असे मत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.स्मारकाच्या विद्युत रोषणाई व सुशोभीकरणाचा शुभारंभ आज श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे पावित्र्य राखण्याचे आणि परिसरात स्वच्छता व शिस्त राखण्याचे आवाहन नागरिकांना केले.



या कार्यक्रमास  श्रीमंतअनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्यासह स्थानिक नागरिक, विविध मान्यवर, तसेच  युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.